चांधई ठोंबरी येथे १५० जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:25+5:302021-04-18T04:29:25+5:30
राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई ठोंबरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले ...

चांधई ठोंबरी येथे १५० जणांचे लसीकरण
राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई ठोंबरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी १५० जणांना कोरोनाची लस देण्यात आली.
अलीकडे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या चांधई ठोंबरी उपकेंद्रात गुरुवारी लसीकरण करण्यात आले. गावाचे सरपंच साहेबराव ठोंबरे व ग्रामसेवक बाबासाहेब वैद्य यांनी ४५ वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले होते. पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद देत १५० ग्रामस्थांनी लस घेतली. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप घोरपडे, स्वाती थोटे, जी.आर. रोडगे, सुधाकर खरात, रेणुका म्हस्के, नीता पवार, सुरेखा जाधव, मंदा वेन्डोले, चंद्रकला वाघमारे, सुनीता गंगाधरे, संगीता रावळकर, शोभा वाघमारे आदी परिश्रम घेत आहेत. या वेळी सरपंच साहेबराव ठोंबरे, आशा काळे, कांचनबाई ठोंबरे, ग्रामसेवक बाबासाहेब वैद्य, त्र्यंबक ठोंबरे, गणेश भारती यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो-
चांधई ठोंबरी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करताना कर्मचारी.