सातोना केंद्रांतर्गत ११ हजार ७०० नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:04 AM2021-09-02T05:04:21+5:302021-09-02T05:04:21+5:30

सातोना खुर्द : परतूर तालुक्यातील सातोना खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २४ गावे आहेत. या गावांमधील नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्राच्या वतीने ...

Vaccination of 11,700 citizens under Satona Center | सातोना केंद्रांतर्गत ११ हजार ७०० नागरिकांचे लसीकरण

सातोना केंद्रांतर्गत ११ हजार ७०० नागरिकांचे लसीकरण

Next

सातोना खुर्द : परतूर तालुक्यातील सातोना खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २४ गावे आहेत. या गावांमधील नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्राच्या वतीने शिबिराचे नियोजन करून लसीकरण केले जात आहे. आजवर या केंद्रांतर्गत ११ हजार ७३७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती डॉ. शिवाजी निलवर्ण यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सातोना खुर्द आरोग्य केंद्राच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्रांतर्गत २१ हजारांवर नागरिकांचे आरोग्य कसे चांगले राहील याबाबतही ग्रामपंचायतींना सूचना देऊन उपाययोजना करण्यात आल्या. या केंद्रांतर्गत ३० ऑगस्टपर्यंत ११ हजार ७३७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने मिळालेल्या लसीतून दहा टक्के लस ही वेस्टेज जात असल्याचेही निलवर्ण यांनी सांगितले.

लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिवाजी निलवर्ण, डाॅ. संजय लाटे, राम अंभुरे, संजय राऊत, प्रवीण सोनार, शिवाजी जाधव, वंदना किर्तने, मंजुळा गारूळे, सुंदरा आमले, शोभा राऊत, कविता लांडगे, शिंदे, मुरमुरे, पूजा भेंडेकर, सत्यभामा वजीर, भगवती खांडेकर, रूपाली चव्हाण, वैशाली खरात, शेषकला जाधव व आशा कार्यकर्ती परिश्रम घेत आहेत.कोट

सूचनांचे पालन गरजेचे

कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे लसीकरणानंतर ही नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बाहेर फिरताना सुरक्षित अंतराचा नियम पाळावा. तसेच शरीर व घर स्वच्छतेकडे ही अधिकचे लक्ष द्यावे. इतर ग्रामस्थांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे.

डॉ. शिवाजी निलवर्ण, सातोना खुर्द.

फोटो

Web Title: Vaccination of 11,700 citizens under Satona Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.