शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

४६ महसूल मंडळांत पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:39 IST

जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी ४६ महसूल मंडळात पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून हलक्या, मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४.९१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी ४६ महसूल मंडळात पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा व गोदावरी नद्यांसह इतर नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.चालू आठवड्यात सतत पडणा-या पावसामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८ मिमी असून, गुरूवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ५०६.४२ मिमी पाऊस झाला आहे. यात जालना महसूल मंडळात १२ मिमी, जालना ग्रामीण २६ मिमी, रामनगर ११ मिमी, विरेगाव १५ मिमी, नेर ३ मिमी, सेवली २५ मिमी, पाचनवडगाव ११ मिमी, वाग्रूळ जहागीर १० मिमी, बदनापूर २९, रोषणगाव १० मिमी, दाभाडी २४ मिमी, सेलगाव ५ मिमी, बावणे पांगरी ५ मिमी पाऊस झाला. तर भोकरदन तालुक्यातील भोकरदन ३४ मिमी, सिपोरा बाजार ३० मिमी, धावाडा ५२ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ३४ मिमी, हस्राबाद ४७ मिमी, राजूर ९ मिमी, केदारखेडा ३९ मिमी, आन्वा १० मिमी पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद ५ मिमी, टेंभुर्णी १२ मिमी, कुंभारझरी ४ मिमी, वरूड १५ मिमी, माहोरा २० मिमी पाऊस झाला. परतूर ८ मिमी, सातोना २.५० मिमी, आष्टी २८ मिमी, वाटूर १८ मिमी, मंठा २ मिमी, ढोकसाल ३२ मिमी, पांगरी गोसावी ७ मिमी पाऊस झाला. अंबड ७ मिमी, धनगर पिंपरी २० मिमी, जामखेड ४ मिमी, रोहिलागड १२ मिमी, सुखापुरी १० मिमी, घनसावंगी १८ मिमी, राणीउंचेगाव २५ मिमी, रांजणी १२ मिमी, तीर्थपुरी २ मिमी, कुंभारपिंपळगाव १३ मिमी, अंतरवली टेंबी ९ मिमी, जांभ समर्थ २ मिमी पाऊस झाला. दरम्यान, सततच्या पावसामुळे उर्वरित कालावधीत परतीचा पाऊस दमदार हजेरी लावेल, अशी आशा निर्माण झाली आहे.गोदावरी नदीपात्रात ४५ हजार क्युसेक्सचा विसर्गशहागड : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात ३५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडीच्या धरण क्षेत्रात येणाºया पाण्याची आवक वाढली तर मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास ५० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार महेश सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जायकवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीपात्र दुथडी वाहत आहे. येथील बंधा-यावर पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पाण्याची आवक वाढल्यानंतर कोणताही धोका होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असून, आपत्ती व्यवस्थापन पथकही सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली.जायकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातून ३५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापन, बचाव साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी नदी, नाले, ओढ्यात प्रवेश करू नये.पुलावरून पाणी वाहत असेल तर वाहने नेऊ नयेत, जनावरांना नदीपात्रात जाऊ देऊ नये, नदीच्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करू नये, अफवांवर विश्वास ठेऊ नये, ग्रामपंचायतींनी दवंडी देऊन नागरिकांना दक्षतेबाबत सूचना द्याव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरriverनदीweatherहवामान