शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

दीड लाख शेतकऱ्यांची माहिती शासकीय वेबसाईटवर अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 1:15 AM

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीनंतर शासनाची कर्जमुक्तीसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द होणार आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील तब्बल २ हजार ८३२ शेतक-यांनी आपल्या कर्जखात्याशी आधार नंबर लिंकिंग केला नसल्याची माहिती समोर आली आहे.आघाडी शासनाने २ लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ज्या शेतक-यांच्या बँक खात्याशी आधार नंबर लिंक नाही त्यांनी आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक करावा, यासाठी प्रशासकीय, बँक पातळीवरून जनजागृती करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील दोन लाखांच्या आतील कर्ज असलेल्या २ लाख ४ हजार ४६२ शेतक-यांपैकी ३१ हजार ५५४ शेतक-यांचे आधार नंबर कर्ज खात्याशी संलग्न नसल्याचे समोर आले होते. त्यानुसार राबविलेल्या प्रक्रियेत आजवर २८ हजार ७७२ शेतक-यांनी आपले आधार नंबर कर्जखात्याशी लिंकिंग करून घेतले आहेत. तर अद्यापही २ हजार ८३२ शेतक-यांचे नंबर कर्जखात्याशी लिंक झालेले नाहीत.आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकेमार्फत शासनाच्या पोर्टलवर लाभार्थी शेतक-यांची माहिती आपलोड करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार आजवर १ लाख ५५ हजार ६१४ शेतकºयांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. ९१० शेतक-यांना लेखी पत्रकर्जमाफीस पात्र ठरणा-या शेतक-यांनी बँकेतील कर्ज खात्याशी आधार लिंकिंग करून घ्यावे, यासाठी प्रशासन, बँकांनी जनजागृती केली आहे. विशेषत: जिल्हा बँकेच्या तब्बल ९१० शेतक-यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने लेखी पत्र देण्यात आले आहेत. मात्र, यातील जवळपास १०० शेतक-यांनी आधार लिंकिंग केली असून, इतर शेतक-यांनी अद्यापही आधार लिंकिंग केले नसल्याचे समजते.समिती करणार तक्रारीचे निरसनशासनाने कर्जमुक्तीस पात्र शेतक-यांची यादी प्रसिध्द केल्यानंतर ती बँक, पतसंस्था, ग्रामपंचायत आपले सरकार केंद्रावर प्रसिध्द केली जाणार आहे. यादीत नाव असेल तर शेतकºयांनी आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार नंबर आणि कर्जमाफी यादीतील आपला विशिष्ट नंबर देऊन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कर्जमुक्तीची रक्कम मान्य असेल तर होकार द्यावा अन्यथा आपली तक्रार आॅनलाईन पध्दतीने नोंदवावी. ही तक्रार आॅनलाईन पध्दतीने तात्काळ जिल्हा समितीकडे येणार असून, जिल्हा समिती या तक्रारीचे निरसन करणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी