शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
4
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
5
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
6
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
7
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
8
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
9
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
10
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
11
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
12
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
13
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
14
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
15
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
16
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
17
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
18
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
19
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:27 IST

'शेतकऱ्यांचा जीव एकच दिसला पाहिजे!' मनोज जरांगे पाटील यांचा एकजुटीसाठी मोठा निर्णय

वडीगोद्री (जालना): राज्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नागपूर येथे मोठे आंदोलन सुरू असताना, शेतकऱ्यांची एकजूट कायम राहावी या भूमिकेतून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील नियोजित बैठक रद्द करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचा जीव एकच दिसला पाहिजे, या भूमिकेवर त्यांनी ठाम राहायला हवे, असे मत जरांगे पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

'दोन जागेवर आंदोलन नको'जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नेत्यांसोबत २ नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, सध्या नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. "शेतकरी आणि शेतकऱ्याचा जीव एकच दिसला पाहिजे. त्यामुळे सध्या दोन जागेवर आंदोलन नको. इकडे आंदोलन सुरू असताना इकडे बैठक घेणं शोभण्यासारखं नाही, ते माझ्या बुद्धीला पटत नाही." असे जरांगे पाटील म्हणाले.

नागपूरच्या आंदोलनानंतर पुढील दिशानागपूर येथील आंदोलनातून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर त्यानंतर आपण बैठक घेऊन सरकार मागण्या कशा मान्य करत नाही हे बघू, असे सूचक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Manoj Jarange cancels meeting to support Nagpur farmers' protest.

Web Summary : Manoj Jarange Patil cancelled a planned meeting, prioritizing unity with farmers protesting in Nagpur. He emphasized solidarity, postponing discussions until after the Nagpur movement's outcome, vowing further action if demands aren't met.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलFarmerशेतकरीBacchu Kaduबच्चू कडूnagpurनागपूर