केंद्रीय मंत्र्यांनी केली अपघातग्रस्ताला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:05+5:302021-01-08T05:43:05+5:30
राजूर : कुत्रा आडवा आल्याने महावितरणच्या सहायक अभियंत्याच्या दुचाकीला गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अपघात झाल्याची घटना जालना- ...

केंद्रीय मंत्र्यांनी केली अपघातग्रस्ताला मदत
राजूर : कुत्रा आडवा आल्याने महावितरणच्या सहायक अभियंत्याच्या दुचाकीला गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अपघात झाल्याची घटना जालना- भोकरदन रोडवरील बाणेगाव पाटीजवळ घडली. या अपघातात सहायक अभियंता एस.के. भालेराव हे रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडले होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून अपघातग्रस्तास मदत केली.
राजूर येथील महावितरणच्या कार्यालयातील सहायक अभियंता एस.के. भालेराव हे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कार्यालयीन कामकाज उरकून भोकरदनकडे दुचाकी (एमएच-१९ सीए-६४८०)ने जात होते. बाणेगाव पाटीजवळ कुत्रा आडवा आल्याने ते रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडले होते. तेवढ्यात जालन्याहून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा ताफा भोकरदनकडे जात होता. त्यांना भालेराव हे जखमी अवस्थेत पडलेले दिसले. गाड्यांचा ताफा थांबवून त्यांनी भालेराव यांना एका वाहनाद्वारे भोकरदन येथे उपचारासाठी पाठविले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
फोटो ओळी
बाणेगाव पाटीजवळ जखमीला मदत करताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे. (छाया- श्याम पुंगळे)