पुतण्याने केला चुलत्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:16 IST2017-12-29T00:16:20+5:302017-12-29T00:16:24+5:30
मंठा येथील जलील कॉलनीमध्ये पुतण्याने चुलत्याचा खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

पुतण्याने केला चुलत्याचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मंठा येथील जलील कॉलनीमध्ये पुतण्याने चुलत्याचा खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.
मंठ्यातील कुरेशी मोहल्ला भागात राहणाºया महंमद कलीम हसन बागवान (२६) याने दारूच्या नशेत जलील कॉलनीतील एका पडक्या घरात चुलता महंमद हनिफ वजीर बागवान (४२) यांचा डोक्यात दगड घालून खून केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीस अटक केली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मंठा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी महेबूब कलीम बागवान यांच्या फिर्यादीवरून महंमद कलीम बागवानविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रफीक शेख यांनी दिली. उपनिरीक्षक शेख आलमगरी तपास करीत आहेत.