पाच सभापतींची बिनविरोध निवड
By Admin | Updated: January 1, 2015 00:25 IST2015-01-01T00:12:22+5:302015-01-01T00:25:11+5:30
जालना : नगरपालिकेच्या विषय समिती सभापती तसेच सदस्य आणि स्थायी समिती सदस्य पदाची निवडणूक बुधवारी बिनविरोध पार पडली

पाच सभापतींची बिनविरोध निवड
जालना : नगरपालिकेच्या विषय समिती सभापती तसेच सदस्य आणि स्थायी समिती सदस्य पदाची निवडणूक बुधवारी बिनविरोध पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संख्याबळ अधिक असल्याने या निवडणुकीत शिवसेना - भाजपा युतीने उमेदवारी दाखल केली नाही.
टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.
या निवडणुकीनुसार उपाध्यक्ष शाह आलमखान यांच्याकडे शिक्षण समिती सभापतीपद देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी सुमन संतोष माधोले, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी रंजना अनंता शेळके, पाणीपुरवठा आणि जलनि:स्सारण सभापतीपदी संजय गुलाबचंद भगत, नियोजन व विकास सभापतीपदी संजय सोपान गायकवाड तर महिला व बालकल्याण सभापती म्हणून आशाताई प्रभूदास ठाकूर यांची निवड करण्यात आली. स्थायी समिती सदस्य म्हणून अनिता विष्णू वाघमारे, संजय मिठ्ठूलाल दाड, सत्यभामा विजय जाधव यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपाध्यक्ष शाह आलम यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)४
भोकरदन - नगरपालिकेच्या पाच सभापतींची व स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. स्थायी समितीमध्ये अध्यक्षा म्हणून नगराध्यक्षा रेखा चंद्रकांत पगारे यांची निवड करण्यात आली.
४विषय समित्यांचे सभापती म्हणून अनुक्रमे पाणीपुरवठा व जलनि:स्सारण सभापती म्हणून उपाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, सा.बां. सभापतीपदी शब्बीरखाँ पठाण, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी रेखा राजेंद्र दारूंटे, नियोजन व विकास सभापती म्हणून शफिकखाँ मेहताब खाँ पठाण तर महिला व बालकल्याण सभापती पदी कमलबाई दादाराव तळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
४विषय समित्यांच्या सभापतींचा स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश आहे. याशिवाय प्रत्येक विषय समितीत चार सदस्यांची निवड करण्यात आली. सकाळी उपविभागीय अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.