उद्धव ठाकरे रविवारी घनसावंगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:05 IST2018-02-02T00:05:03+5:302018-02-02T00:05:09+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी घनसावंगी येथे येत असून, त्यांच्या हस्ते शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

उद्धव ठाकरे रविवारी घनसावंगीत
जालना : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी घनसावंगी येथे येत असून, त्यांच्या हस्ते शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
घनसावंगी मतदारसंघाच्या शिवसैनिकांसाठी व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी घनसावंगी येथे हक्काचे कार्यालय असावे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून डॉ. हिकमत उढाण यांनी जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या संपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच घनसावंगी येथील विजयराव देशमुख स्टेडियमवर दुपारी १२ वाजता शेतकरी मेळावा होणार आहे. याप्रसंगी पर्यावरण मंत्री रामदास कदम, मिलींद नार्वेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विनोद घोसाळकर, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, माजी आ. शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
येत्या रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते घनसावंगी येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून घनसावंगी मतदारसंघातील जनतेच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येणार आहेत.
- डॉ. हिकमत उढाण, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना, जालना.