उद्धव ठाकरे यांची आज घनसावंगीत सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:02 IST2018-02-04T00:02:09+5:302018-02-04T00:02:12+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी घनसावंगी येथे येत असून त्यांच्या हस्ते शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

उद्धव ठाकरे यांची आज घनसावंगीत सभा
जालना : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी घनसावंगी येथे येत असून त्यांच्या हस्ते शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. हे संपर्क कार्यालय मराठवाड्यातील सर्वात मोठे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या संपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच घनसावंगी येथील विजयराव देशमुख स्टेडियमवर दुपारी १२ वाजता शेतकरी मेळावा होणार आहे. याप्रसंगी पर्यावरण मंत्री रामदास कदम, मिलींद नार्वेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विनोद घोसाळकर, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, माजी आ. शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे आदींची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. हिकमत उढाण यांनी केले आहे.