आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दुचाकी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST2021-02-09T04:33:19+5:302021-02-09T04:33:19+5:30
वडीगोद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील २० दिवसांपासून साष्टपिंपळगाव येथे आंदोलन सुरू आहे. या ...

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दुचाकी रॅली
वडीगोद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील २० दिवसांपासून साष्टपिंपळगाव येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रविवारी वडीगोद्री ते साष्टपिंपळगावपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीला वडीगोद्री येथून सुरुवात झाली. ही वडीगोद्री, अंकुशनगर मार्गे साष्टपिंपळगावपर्यंत काढण्यात आली होती. यावेळी शिवबा संघटनेचे तालुका सचिव शिवाजी काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, नितीन काळे, प्रसाद पिंगळे, अजयसिंह काळे, मनीष काळे, रमेश काळे, सोमनाथ काळे, संभाजी काळे, प्रशांत काळे, शिवकुमार वाघुंडे, सुरेश बाबासाहेब काळे, संदीप काळे, मुकुंद काळे, अमर काळे, अभिजित काळे, अजय काळे, बाळू काळे, कृष्णा वाघ, संभाजी अर्जुन काळे, गणेश जाधव, रणवीर काळे, किशोर काळे, नितीन कनके, आप्पासाहेब काळे आदींची उपस्थिती होती.