केंधळी येथून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:02+5:302021-08-22T04:33:02+5:30
मंठ्यात ९० हजार रुपयांची चोरी जालना : मंठा येथील सुगंधानगर भागात घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम व ...

केंधळी येथून दुचाकी लंपास
मंठ्यात ९० हजार रुपयांची चोरी
जालना : मंठा येथील सुगंधानगर भागात घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम व दागिने असा एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी बालासाहेब श्रीरंगराव खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार चव्हाण अधिक तपास करत आहेत.
सत्यमनगरातून दुचाकी लंपास
जालना : शहरातील चंदनझिरा परिसरातील सत्यमनगरातून विलास मगन गिरी यांच्या मालकीची दुचाकी शुक्रवारी रात्री चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक दिलवाले अधिक तपास करत आहेत.