दोन पट्ट्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:49+5:302021-01-19T04:32:49+5:30
तारा लोंबकळल्या जाफराबाद : शहरातील बसस्थानकामागील नगर पंचायत, आठवडे बाजार व किल्ला परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजेच्या तारा मागील काही ...

दोन पट्ट्यातील बातम्या
तारा लोंबकळल्या
जाफराबाद : शहरातील बसस्थानकामागील नगर पंचायत, आठवडे बाजार व किल्ला परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजेच्या तारा मागील काही दिवसांपासून काही प्रमाणात खाली आल्या आहेत. विशेष म्हणजे तारा लोंबकळल्या ठिकाणी अनेक दुकानी आहेत. त्यामुळे अपघाताची भीती नाकारता येत नसून, वेळीच लोंबकळलेल्या वीज तारांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथील फळ बागायतदार असलेल्या शेतकऱ्यांना मंजुर झालेल्या अनुदानात मोठा गैरव्यवहार झाला आहे. वेळीच याची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शेतकरी गंगाराम उढाण यांनी तहसीलदारांना दिले आहे. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांकडे मोसंबीची फळबाग नसतानाही त्यांच्या नावे बॅंकेत अनुदान आल्याचे आढळून आले आहे, असेही उढाण यांनी निवेदनात म्हटले आहे.