शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:32 IST

लाच्या सरंक्षण कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नदीपात्रात पडल्याने जागीच ठार झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील धामनगाव धाड येथे गुरुवारी रात्री घडली. सचिन विठोबा कानडजे (२६) असे मयत युवकाचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत रस्त्याने पायी जात असलेल्या एकास वाहनाने चिरडल्याची घटना चंदनझिरा परिसरातील तंत्रनिकेत समोर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव रेणुकाई / चंदनझिरा : पुलाच्या सरंक्षण कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नदीपात्रात पडल्याने जागीच ठार झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील धामनगाव धाड येथे गुरुवारी रात्री घडली. सचिन विठोबा कानडजे (२६) असे मयत युवकाचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत रस्त्याने पायी जात असलेल्या एकास वाहनाने चिरडल्याची घटना चंदनझिरा परिसरातील तंत्रनिकेत समोर घडली.कुलमखेड येथील सचिन विठोबा कानडजे हा डोमरूळ येथून आपल्या गावी दुचाकीवर येत होता. दरम्यान, धाड नजीक बाणगंगा नदीवरील संरक्षक लोखंडी अ‍ँगलला त्याची दुचाकी जोरात धडकली. दुचाकीची धडक जोरात असल्याने तो सरळ नदीपात्रात पुलावरून पडला. त्यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच गावातील तरुणांनी त्यास तात्काळ रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच धाड येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन मुंडे, पोलिस कॉन्स्टेबल गजानन मोरे, ऋषीकेश पालवे, बळीराम खंडागळे हे करत आहेत.पुलाचा परिसर अपघात प्रवण धाड गावानजीकचा बाणगंगा नदीवरील हा पूल गेल्या काही दिवसापासून अपघात प्रवण बनला आहे. पुलाला मजबूत कठडे नसल्याने अपघात होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सचिन कानडजे यांच्यावर शुक्रवारी कुलमखेड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठारचंदनझिरा: जालना -औरंगाबाद रोडवरील शासकीय तंत्रनिकेतनसमोर गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पायी जाणाºया इसमास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.या इसमाची अजूनही ओळख पटलेली नाही. त्याच्या अंगात चॉकलेटी चौकडा शर्ट, उजव्या हातात काळा धागा व गळ्यात तुळशीची माळ आहे.अज्ञात वाहन चालकाविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.उप.नि.नजीर शेख करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू