जिल्हाभरातील चिमुकल्यांना रविवारी ‘दोन थेंब जीवनाचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:38+5:302021-02-05T08:04:38+5:30
जालना : कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारी रोजी जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. या ...

जिल्हाभरातील चिमुकल्यांना रविवारी ‘दोन थेंब जीवनाचे’
जालना : कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारी रोजी जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ४८ हजार १३ बालकांना पाेलिओची लस दिली जाणार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले व आरोग्य विभागाने या लसीकरणाची तयारी केली आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर बैठका, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, गावपातळीवर जनजागृतीचा उपक्रमही राबविण्यात आला आहे. जिल्ह्याला तीन लाख ३१ हजार डोस प्राप्त झाले आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर ही लसीकरण मोहीम प्रत्येक वर्षाप्रमाणे यशस्वी व्हावी, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा काम करत आहे. पालकांनी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना पोलिओचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी पूर्ण
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या बैठकींमध्येही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पल्स पोलिओ लसीकरणापासून जिल्ह्यातील एकही बालक वंचित राहू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत आहे. त्यासाठी शहरी, गाव पातळीवरील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
कोरोनामुळे पुढे ढकललेली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारी रोजी जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाली असून, पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. पालकांनी पाच वर्षाच्या आतील बालकांना डोस पाजून घ्यावेत.
-विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना
अशी चालेल मोहीम
० ते ५ वर्षे वयोगटातील लाभार्थी २,४८,०१३
पोलिओ डोस प्राप्त ३,३१,०००
एकूण बुथ १,७४७
आरोग्यसेवक ४,७०७
पर्यवेक्षक ३,३२७
आरोग्य संस्था ५५
मोबाईल पथके ११८
ट्रांझिट पथके २०२