दोन दिवसांत ३१ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:35 IST2021-08-17T04:35:48+5:302021-08-17T04:35:48+5:30
जालना : मागील दोन दिवसांत ३१ जणांनी कोरोनावर मात केली असून, रविवारी आठजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर सोमवारी जिल्ह्यात ...

दोन दिवसांत ३१ जणांची कोरोनावर मात
जालना : मागील दोन दिवसांत ३१ जणांनी कोरोनावर मात केली असून, रविवारी आठजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर सोमवारी जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही.
रविवारी जिल्ह्यात आठ रुग्ण आढळून आले आहेत. यात जालना शहरातील दोघांचा समावेश आहे. घनसावंगी १, अंबड तालुक्यातील हस्तपोखरी १, शहागड १, रामगव्हाण येथील एकाला बाधा झाली आहे. बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी १, भोकरदन तालुक्यातील वालसा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी कोरोनामुक्त झालेल्या १४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. जिल्ह्यात सोमवारी एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही, तर कोरोनामुक्त झालेल्या १७ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ६५६ वर गेली असून, त्यातील ११८३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० हजार ३७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात ११ जणांवर उपचार केले जात आहेत. यात जालना येथील राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉकमध्ये दोघांवर, तर अंबड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात नऊजणांवर उपचार सुरू आहेत.