सराफा बाजारपेठ बंदमुळे चार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST2021-08-24T04:33:56+5:302021-08-24T04:33:56+5:30

जालना येथील सराफा बाजारात जवळपास लहानमोठी अशी मिळून जवळपास ११० दुकाने आहेत. दररोज या बाजारपेठेत सोने-चांदी विक्रीतून चार ते ...

Turnover of Rs 4 crore stalled due to closure of bullion market | सराफा बाजारपेठ बंदमुळे चार कोटींची उलाढाल ठप्प

सराफा बाजारपेठ बंदमुळे चार कोटींची उलाढाल ठप्प

जालना येथील सराफा बाजारात जवळपास लहानमोठी अशी मिळून जवळपास ११० दुकाने आहेत. दररोज या बाजारपेठेत सोने-चांदी विक्रीतून चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. ती उलाढाल आज ठप्प झाली. दोन दिवसांपूर्वीच सराफा असोसिएशनने बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा दिला होता.

ऐन सणासुदीच्या काळात सराफा बाजार बंद राहणे ही ग्राहक, व्यापारी तसेच सरकारसाठीही नुकसानकारक आहे. सोमवारी सकाळी एकही दुकान न उघडल्याने य बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

चौकट

तीन वर्षांचा कालावधी गरजेचा

हॉलमार्कचा शिक्का हा दागिन्यांवर उमटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज लागणार आहे. कोरोनामुळे आधीच अडचणीत आलेला हा व्यापार या नवीन निर्णयामुळे संकटात सापडला आहे. हॉलमार्किंगला व्यापाऱ्यांचा विरोध नाही. परंतु, यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागेल अशी माहिती असोसिएशनचे पदाधिकारी महेश दुसाने यांनी दिली.

Web Title: Turnover of Rs 4 crore stalled due to closure of bullion market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.