शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

वडीगोद्री येथे हळदी - कुंकू कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST

रस्त्यावर खड्डे जालना : जालना तालुक्यातील साळेगाव रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. हे ...

रस्त्यावर खड्डे

जालना : जालना तालुक्यातील साळेगाव रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. हे खड्डे बुजविण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बाल स्वास्थ्यच्या शिबिराला प्रतिसाद

जालना : जालना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डिस्ट्रिक्ट इंटरनॅशनल सेंटर, जिल्हा रूग्णालय यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या तपासणी शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेंदू तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. वर्षा वैद्य उपस्थित होत्या.

सुरेंद्रकुमार जायस्वाल यांना श्रध्दांजली

जालना : येथील ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते सुरेंद्रकुमार किशनलाल जायस्वाल यांना शनिवारी श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी, आयेशा मुलानी, पारस नंद, मुकेश परमार, दिनेश नंद, अशपाक पटेल, राहुल वाहुळे, शेख इर्शाद, मनियार, शेख मुजिनोद्दीन, बालाजी अडियाल, मयूर अग्रवाल आदी उपस्थित होते.

आमदार कैलास गोरंट्याल यांचा सत्कार

जालना : जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांची काॅंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार गोरंट्याल यांनी काॅंग्रेस पक्षाला राज्यातील नंबर एकचा पक्ष करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी भगवती पुरोहित संघाचे अध्यक्ष विनायक महाराज फुलंब्रीकर, कार्याध्यक्ष राजेश सामानगावकर, गणेश महाराज पांडे, शंभू मांडे, केशव गुरू मंजरथ कर, विनायक शास्त्री आदी उपस्थित होते.

आरक्षणासाठी झिरपी ग्रामपंचायतीसमोर उपोषण

अंबड : अंबड तालुक्यातील झिरपी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर भाजप, अखिल भारतीय छावा संघटना व सकल मराठा समाजाच्यावतीने साष्ट पिंपळगाव येथील राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी शरद भवर, शेख बशिर, ज्ञानेश्वर भवर, कल्याण भवर, कार्तिक भवर, अनिल भवर, रामदास भवर आदी उपस्थित होते.

जीवनात बदलासाठी संत विचार आचरणात आणा

कुंभारपिंपळगाव : पुस्तक माणसाला परिपक्व बनवते, पण अनुभव मात्र गरुड बनवतो. मनुष्याच्या जीवनामध्ये काही बदल होण्याकरिता संत महात्म्यांचे विचार आचरणात आणणे फार महत्त्वाचे असल्याचे सीताराम महाराज रोडगे यांनी सांगितले. घनसावंगी तालुक्यातील भादली येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून, या सप्ताहातील कीर्तनात रोडगे महाराजांनी निरुपण केले. यावेळी भाविक उपस्थित होते.

तीर्थपुरीत गोपीचंद पडळकर यांचा सत्कार

तीर्थपुरी : धनगर समाजाचे नेते तथा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे तीर्थपुरी येथे एका विवाहप्रसंगी आले असता, त्यांनी घनसावंगी तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शिवाजी बोबडे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, शिवसेनेचे कार्यकर्ते सुदाम मापारे, भगवान मापारे, सतीश केसकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जालना ते वाकुळणी बस सुरू करा

जालना : जालना ते वाकुळणी ही बससेवा पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांनी केली आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर ही बससेवा बंद करण्यात आली होती. शासनाने अनलॉक केल्यानंतर अनेक व्यवहार सुरळीत झाले आहेत. परंतु, जालना ते वाकुळणी ही बस अद्यापही सुरु करण्यात आलेली नाही. एस. टी. महामंडळाने याकडे लक्ष देऊन तातडीने ही बस सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी केली आहे.