वडीगोद्री : ट्रक चालकाचे नियत्रंण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळून उलटल्याची घटना धुळे-सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ सोमवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला आहे. रघुनाथ दशरथ (वय ३८, रा. बिदर-कर्नाटक) असे मृत चालकाचे नाव आहे.
हैदराबादहून गुजरातकडे जाणारा ट्रक (एपी २८, टीई ६३६८) धुळे-सोलापूर महामार्गावरून जात असताना अंबड तालुक्यातील बारसवाडा फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळून उलटला. या अपघातात ट्रक चालक रघुनाथ दशरथ हे वाहनाखाली दबून जागीच ठार झाले. ट्रकमधून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या अपघाताची माहिती कळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविण्यात आला.