कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST2021-09-08T04:36:02+5:302021-09-08T04:36:02+5:30

देऊळगाव राजा : कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करून रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, टेक्निशियन व इतर ...

A tribute to the doctors who did an excellent job during the Corona period | कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार

कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार

देऊळगाव राजा : कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करून रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, टेक्निशियन व इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

ट्रामा केअर सेंटर येथील कोरोना रुग्णालयात मागील एक वर्षापासून अस्थायी स्वरूपात डॉक्टर, नर्स, एक्स-रे टेक्निशियन, सफाई कामगार असे एकूण ३० कर्मचारी सेवा बजावत होते. यापैकी २४ अस्थायी कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२१ रोजी संपुष्टात आला आहे. शासन निर्णयाप्रमाणे सदरील कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे आदेश ग्रामीण रुग्णालयाला प्राप्त झाले. त्यामुळे २४ कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. या सर्वांनी कोरोना काळात कोरोना रुग्णांची सेवा केली होती. याशिवाय लसीकरणामध्ये सुद्धा भरीव योगदान दिले. या कर्मचाऱ्यांना ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. याप्रसंगी डॉ. सोमेश राजमाने, डॉ. सुभाष शिंगणे, डॉ. वैशाली मांटे, डॉ. सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर सांगळे, डॉ. प्रियंका जायभाये, डॉ. केतकी भावसार, डॉ. भाग्यश्री कोल्हे, डॉ. समरीन, डॉ. वैभव ढाकणे, डॉ. मंगेश वायाळ, डॉ. इरफान अली, दिशा रायपुरे, आशा पाटील, निशा इंगळे, भाग्यश्री सुरडकर, स्वाती पवार, गौरव गीते, वैभव मुंढे, हनुमान जायभाये, पवन नागरे, सादिक पठाण, ज्योती सुनगत आदींची उपस्थिती होती.

Web Title: A tribute to the doctors who did an excellent job during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.