परीक्षेची आवेदनपत्रे मिळेनात
By Admin | Updated: September 7, 2014 00:22 IST2014-09-06T23:48:38+5:302014-09-07T00:22:56+5:30
जाफराबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभाग आणि महाराष्ट्र राज्य कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने मोठा फटका महाविद्यालय प्रशासन

परीक्षेची आवेदनपत्रे मिळेनात
जाफराबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभाग आणि महाराष्ट्र राज्य कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने मोठा फटका महाविद्यालय प्रशासन यांच्यासह विद्यार्थ्यांना बसत आहे.
विद्यापीठ परीक्षा विभागाने परीक्षा आवेदनपत्र दाखल करण्याच्या तारखा निश्चित केल्या असतांना मुदत संपूनही विद्यार्थी परीक्षा आवेदन पत्र महाविद्यालयास मिळाले नाही, यामुळे विद्यार्थी तसेच महाविद्यालय प्रशासन संभ्रम अवस्थेत असल्याची माहिती समोर आलीय.
महाविद्यालय स्तरावर बी.ए., बी.कॉम. बी.एस्सी. पदवी परीक्षा आवेदन पत्र स्वीकारण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप एमकेसीएलकडून महाविद्यालयांना परीक्षा आवेदन पत्रे मिळालेले नाही. परीक्षा विभाग यांच्याकडून परीक्षा आवेदन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत २० आॅगस्ट देण्यात आली होती. यामध्ये पुन्हा बदल करून ही मुदत ३० आॅगस्ट पर्यंत वाढविण्यात आली. मात्र अद्याप आवेदन पत्र महाविद्यालय स्तरावर प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.
परीक्षेच्या तारखा संपून देखिल आवेदनपत्रे मिळत नाही. अशा परिस्थिती मध्ये महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून यांच्याकडून परीक्षा आवेदनपत्र स्वीकारायचे कधी व विद्यापीठ परीक्षा विभागाकडे सादर करायचे कधी हा प्रश्न महाविद्यालय प्रशासन यांनी देखील उपस्थित केला जात आहे.
परीक्षा शुल्कापासून परीक्षा आवेदनपत्र आॅनलाईन प्रक्रियेला जोडणे यामध्ये सुध्दा वेळ जात आहे. मात्र एमकेसीएल व विद्यापीठ परीक्षा विभाग यांच्या समन्वयातून सुरु असलेल्या प्रक्रियामुळे प्रवेश प्रक्रिया असो की परीक्षा कुठलीच कामे वेळेच्या आत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्याचा त्रास देखील विद्यार्थ्यांना होत आहे.
परीक्षेच्या तारखा व आवेदनपत्रे प्रक्रिया याविषयी महाविद्यालये एमकेसीएल विद्यापीठ परिक्षा विभाग यांच्याकडे महाविद्यालय स्तरावरुन विचारणा करण्यात येते; परंतु समाधानकारक उत्तर मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठ परीक्षा विभाग यांच्याकडे परीक्षेच्या तारखा निश्चित करण्याचे अधिकार असले तरी एमकेसीएल यांच्यावर नियंत्रण कोणाचे याचे उत्तर मात्र मिळत नाही.
ग्रामीण भागातील महाविद्यालयांना या अडचणी सोबत इंटरनेट सुविधा, वीज भारनियमन असे असंख्य प्रश्न आहेत. याचा विचार व्हावा, अशी देखील मागणी महाविद्यालयाकडून होत आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा देता येणार नाही, असा सूर आहे. (वार्ताहर)
विद्यापीठ परीक्षा विभागाने परीक्षा आवेदनपत्र दाखल करण्याच्या तारखा निश्चित केल्या असतांना मुदत संपूनही परीक्षा आवेदन पत्र महाविद्यालयास मिळाले नाही, यामुळे विद्यार्थी तसेच महाविद्यालय प्रशासन संभ्रम अवस्थेत असल्याची माहिती समोर आलीय.