लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रक्तदान हे सर्वात महान दान म्हणून आजच्या काळात ओळखले जाते. हे रक्तदान करण्यासाठीच्या पध्दतीतही काळानुरूप बदल झाले आहेत. अद्यायावत तंत्रज्ञानामुळे रक्तातील पांढऱ्यापेशी अर्थात प्लेटलेट विलग करून घेतल्या जात आहेत. हे करत असतांना पुन्हा एका मशीनद्वारे संबंधित रक्तदान करणा-याच्या शरिरात पुन्हा चढविले जात आहे. या प्लेटलेट देणाऱ्यांच्या संख्येत आता लक्षणीय वाढ झाली असून, हा ट्रेंड विकसित होत आहे.रक्तातील प्लेटलेट विलगीकरण करणारी यंत्रणा विकसित झाल्याने रक्तदान करणा-यांमध्ये आता भीती उरली नसल्याचे जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शिवराज जाधव यांनी दिली. आता पर्यंत जनकल्याण ‘प्लेटलेट’ देण्यासाठीचा ट्रेंड वाढलारक्तपेढीत ६३५ जणांनी रक्तदान केले असून, त्याचा लाभ ९६८ रूग्णांना झाला आहे. प्लेट देणाºयांचा एका कार्यक्रमात उद्योजक रमेशभाई पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हिरेन मेहता, संदीप राठी, प्रणय राठी, अनिल जाधव, दिलीप चेचाणी, गणेश पांगारकर, शुभम मुंदडा, निखिज जैस्वाल, शशीकांत तिवारी आदी उपस्थित होते.
‘प्लेटलेट’ देण्यासाठीचा ट्रेंड वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:33 IST