पाणीपुरवठा योजनेच्या कामात झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:18+5:302021-01-01T04:21:18+5:30

सिल्लोड- भोकरदन शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणातून १०० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर ...

Tree felling in water supply scheme work | पाणीपुरवठा योजनेच्या कामात झाडांची कत्तल

पाणीपुरवठा योजनेच्या कामात झाडांची कत्तल

सिल्लोड- भोकरदन शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणातून १०० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. या योजनेचे काम ८० टक्क्यांपर्यंत झाले आहे. भोकरदन शहरात पाईपलाईनचे काम बाकी होते. गेल्या आठ दिवसांपासून शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. पोकल्यांड, जेसीबीद्वारे चारी, खोदकाम सुरू आहे. मात्र हे काम सुरू असताना रस्त्याच्या बाजूला असलेली झाले तोडली जात आहे. संबंधित कंत्राटदाराने झाडे तोडण्याची कुठलीही परवानगी घेतली नाही. जर पाईपलाईनचे खोदकाम बाजूच्या साईडने केले असते. तर ही झाडे वाचवता आली असती.

भोकरदन शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती व नगरपरिषद, व्यापारी यांनी ६ ते ७ वर्षांपूर्वी झाडांची लागवड केली होती. गेल्या तीन वर्षांपासून चांगला पाऊस पडत असल्याने झाडांची वाढ चांगली झाली होती. बाजार समितीच्या वतीने या झाडांना पाणीदेखील टाकण्यात आले होते; मात्र, मोठाली झालेली झाडे कंत्राटदाराने तोडली आहे. परवानगी न घेता झाडे तोडणाºयावर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमीतून होत आहे.

बँकेचे व्यवहार ठप्प

भोकरदन शहरात पाईपलाईनसाठी चारी खोदकाम करण्यात येत आहे. त्यामध्ये दूरसंचार विभागाचे केबल जेसीपीने तुटल्याने या परिसरातील पोस्ट आॅफिस, महाराष्ट्र बँक, गजानन बँक, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, देवगिरी नागरी पतसंस्था, विवेकानंद पतसंस्था, दुय्यम निबंधक कार्यालयासह अनेक व्यापाºयांचे टेलिफोन बंद पडले आहे. यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहे.

फोटो ओळी

सिल्लोड- भोकरदन संयुक्त पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्या कामात रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडे उखडून टाकण्यात आली आहे.

Web Title: Tree felling in water supply scheme work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.