वालसांवगीत जखमी वानरावर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:06+5:302021-02-05T08:06:06+5:30
सेलगावात विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप जालना : सेलगाव येथील नूतन वसाहत शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संजय ...

वालसांवगीत जखमी वानरावर उपचार
सेलगावात विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप
जालना : सेलगाव येथील नूतन वसाहत शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संजय हेरकर, शालेय समिती अध्यक्ष दाविद घोरपडे, उपाध्यक्ष योगेश जाधव, माया बोर्डे, सविता वाघस्कर, कावेरी सोनवणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षकांची रिक्तपदे भरण्याची मागणी
वालसावंगी : येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत प्राथमिक पदवीधरांची पाच पदे रिक्त आहेत. तसेच शिपायांची तीन पदे रिक्त आहेत. रिक्त कामांमुळे शाळेच्या कामकाजासह ज्ञानदानावरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन रिक्तपदे तातडीने भरावीत, अशी मागणी ग्रामस्थ, पालक करीत आहेत.
अंबडमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
अंबड : येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार विद्याचरण कडवकर, नायब तहसीलदार बाबूराव चंडोल, डी. एन. पोटे, उद्धव जाधव आदींची उपस्थिती होती.