शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

रेल्वे रद्द झाल्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांची चांदी; मुंबईचे तिकीट १४०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:53 IST

रविवारी मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांकडून रविवारी जास्तीचे भाडे आकारले जात

जालना : मध्य रेल्वेकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने जनशताब्दीसह अनेक रेल्वेगाड्या २६ ते २९ जूनदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. याच संधीचा फायदा घेऊन ट्रॅव्हल्सवाल्यांनी भाडेवाढ केली आहे. मुंबईसाठी १४०० रुपये, तर पुण्यासाठी ७०० रुपयांचे भाडे आकारले जात आहे, असे असतानाही याकडे आरटीओ कार्यालयाचे दुर्लक्ष पहायला मिळत आहे याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

मध्य रेल्वेच्या अंकाई किल्ला-मनमाडदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम २९ जूनपर्यंत चालणार आहे. त्यामुळे २५ ते २९ जूनदरम्यान जनशताब्दी एक्स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, नांदेड - मनमाड एक्स्प्रेस, काकीनाडा पोर्ट - साईनगर शिर्डी आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जालन्यातून मुुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिवाय, बहुतांश जण जालना ते औरंगाबाद अपडाऊनदेखील करतात. रेल्वेगाड्या बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वेगाड्या बंद असल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सला पसंती देत आहेत; मात्र ट्रॅव्हल्सचालकांनी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केली आहे. मुंबईला जाण्यासाठी चक्क १४०० रुपये घेतले जात आहेत, तर पुण्याला जाण्यासाठी ७०० किंवा ८०० रुपयांचे तिकीट दिले जात आहे, असे असतानाही प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत आरटीओ अधिकारी विजय कोठाळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

मला मुंबईला काम आहे. रेल्वे बंद असल्याने मी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढण्यासाठी गेलो. त्यांनी चक्क १४०० रुपये भाडे सांगितले. त्यामुळे पुण्यासाठी विचारणा केली असता, ७०० रुपये भाडे सांगितले. त्यामुळे बसने जाण्याचा निर्णय घेतला.- अजय मोरे, प्रवासी

रविवारी जास्तीचे भाडेरविवारी मुंबई, पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालकांकडून रविवारी जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचे एका ट्रॅव्हल्समालकाने सांगितले. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. ट्रॅव्हलचालकांच्या या मनमानी कारभाराकडे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन