ट्रान्सफार्मरच्या तारा, ऑईल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:35 IST2021-08-17T04:35:40+5:302021-08-17T04:35:40+5:30
तालुक्यातील टाकरखेड भागीले येथे खडक पूर्णा प्रकल्प क्षेत्रात आधुनिक मशनरीसह इलेक्ट्रॉनिक यंत्रणा कार्यान्वित आहे. यामध्ये विद्युत ट्रान्सफार्मरच्या कार्यालयात ...

ट्रान्सफार्मरच्या तारा, ऑईल लंपास
तालुक्यातील टाकरखेड भागीले येथे खडक पूर्णा प्रकल्प क्षेत्रात आधुनिक मशनरीसह इलेक्ट्रॉनिक यंत्रणा कार्यान्वित आहे. यामध्ये विद्युत ट्रान्सफार्मरच्या कार्यालयात यू. एम. १५५५/१७४९ या मशिनरीमधील अडीच लाख रुपये किमतीची ६९३ किलोंची तार, तसेच तेथील ७२ हजार रुपयांचे ८०० लिटर ऑइल लंपास केले. त्याच ठिकाणी कार्यान्वित असलेल्या दुसऱ्या मशिनरीमधील तीस हजार रुपये किमतीची तार, १८ हजारांचे २०० लिटर ऑईल असा एकूण सहा लाख, ४२ हजार रुपयांचा मुद्दमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी अभियंता अभिराज सुशील कुमार जैन (वय ३१) यांनी शनिवारी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे करीत आहेत.