पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरांचे स्थलांतर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:21 AM2018-10-24T00:21:53+5:302018-10-24T00:22:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंकुशनगर : तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती व खडकाळ व माळरानावरील जमिनीतील पाण्याअभावी पिकांचे झालेले हाल, अठराविश्व ...

Transfer of sugarcane laborers to fill stomach! | पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरांचे स्थलांतर !

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरांचे स्थलांतर !

Next
ठळक मुद्देअंकुशनगर : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे परिसरातील स्थिती नाजुक

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुशनगर : तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती व खडकाळ व माळरानावरील जमिनीतील पाण्याअभावी पिकांचे झालेले हाल, अठराविश्व दारिद्, वाढलेला कर्जबाजारीपणा, हाताला रोजगार नाही. हिरावून घेणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी घरदार सोडण्याशिवाय पर्याय नाही. भागातील शेकडो मजूर पोटाच्या खळगीसाठी उसतोडीसाठी जात आहेत.
हातावर पोट असलेल्या भूमिहीन व अल्पभुधारक लोकांची पोटाची खळगी भरण्यासाठी हेळसांड सुरू आहे. घरातील आर्थिक चणचणीमुळे भांडणे ऐकून चिमुकले भेदरतात. या काळजाच्या तुकड्यांना निदान पोटभर खायला मिळावे ही आस बाळगत बिºहाड पाठीवर घेऊन तालुक्यातील मजूर जात आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने व बाहेरील राज्यामधील कारखान्याला ऊसतोडणी करण्यासाठी ऊसतोडणी मजुरांची धावपळ सुरू आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर सुरू झाल्याने कामगारांना दिवाळी स्वत:च्या घरी साजरी करता येणार नाही. आता कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊस तोड मजुरांनी उसाच्या फडाची वाट धरली आहे. हे कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी साखर कारखान्यांची वाट धरतात. ऊस तोडणीसाठी समर्थ कारखान्यावर तालुक्यातील अनेक तांडे व वस्त्या येऊ लागले आहेत.

Web Title: Transfer of sugarcane laborers to fill stomach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.