जाफराबाद येथे ग्रामपंचायत निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:30+5:302020-12-27T04:22:30+5:30
जाफराबाद : जाफराबाद तालुकांतर्गत होणाऱ्या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात पार पडले. यात मतदान ...

जाफराबाद येथे ग्रामपंचायत निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
जाफराबाद : जाफराबाद तालुकांतर्गत होणाऱ्या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात पार पडले. यात मतदान केंद्राध्यक्षांसह मतदान अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी तहसीलदार सतीश सोनी यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, नेहमीप्रमाणे शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी निवडणुकीत चोख कर्तव्य बजावून ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडावी. यावेळी शिक्षक जमीर शेख यांनी मतदान केंद्राध्यक्षांसह मतदान अधिकाऱ्यांना करावयाची कामे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना चित्रफितीद्वारेदेखील प्रशिक्षण देण्यात आले. कंट्रोल युनिट व बायलेट युनिट हाताळण्यासंबंधीचे प्रात्यक्षिकही यावेळी मास्टर ट्रेनर धनंजय मुळे व प्रा. अरुण आहेर यांनी करून दाखविले. या प्रशिक्षणात एकूण ३२४ प्रशिक्षणार्थिंची उपस्थिती होती. प्रशिक्षणासाठी नायब तहसीलदार केशव डकले, गटशिक्षणाधिकारी जिनेंद्र काळे, मास्टर ट्रेनर शेख जमीर, प्रा. दत्ता देशमुख, धनंजय मुळे, प्रा. अरुण आहेर, संजय निकम, सुनील अंभोरे, गणेश गवळी, मुन्ना बिसेन, आढाव, सावंत आदींनी पुढाकार घेतला.
फोटो
जाफराबाद येथील तहसील कार्यालयात आयोजित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना तहसीलदार सतीश सोनी. दुसऱ्या छायाचित्रात कंट्रोल युनिट व बायलेट युनिटचे प्रात्यक्षिक दाखविताना मास्टर ट्रेनर धनंजय मुळे, प्रा. अरुण आहेर.