वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:41+5:302021-01-04T04:25:41+5:30
निवडणुकीसाठी एक हजार ३२ अधिकारी घनसावंगी : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया होत आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाच्या ...

वाहतुकीची कोंडी
निवडणुकीसाठी एक हजार ३२ अधिकारी
घनसावंगी : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया होत आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाच्या वतीने तब्बल एक हजार ३२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संबंधितांना निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. उमेदवारांनीही अचारसंहितेचे उल्लंघन करू नये, याबाबत निवडणूक विभागाच्या वतीने विशेष दक्षता घेतली जात आहे.
महात्मा ज्योतिबा फुले चौकाचे उद्घाटन
जालना : शहरातील प्रभाग क्रमांक २३ मधील महात्मा ज्योतिबा फुले चौकाचे उद्घाटन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक महावीर ढक्का, नगरसेवक किशोर गरदास, सभापती हरीष देवावाले, राहुल हिवाळे, माजी नगरसेविका गंगुबाई वाघमारे, मंगल खांडेभराड, माजी नगरसेवक बाबू जाधव, सैय्यद करीम, राजेंद्र जाधव, सुभाष सातपुते, संतोष जमधडे, विनायक चितळकर यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.