वाहतूककोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:54+5:302021-02-05T08:04:54+5:30

चिमुकलीने दिला निधी जालना : आयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणासाठी शहरातील राणा क्रांतिसिंह, राणा रणवीरसिंह व प्रज्ञादेवी या तीन ...

Traffic congestion persists | वाहतूककोंडी कायम

वाहतूककोंडी कायम

चिमुकलीने दिला निधी

जालना : आयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणासाठी शहरातील राणा क्रांतिसिंह, राणा रणवीरसिंह व प्रज्ञादेवी या तीन चिमुकल्यांनी खाऊचे पैसे निधी म्हणून दिले आहेत. यावेळी धनसिंह सूर्यवंशी, प्रतीदेवी सूर्यवंशी, ईश्वर बिल्होरे आदी उपस्थित होते.

११४ जणांचे रक्तदान

अंबड : प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील समाजभान टीमच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ११४ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.

बालसंवाद कार्यक्रम

जालना : तालुक्यातील दरेगाव येथील शहीद भगतसिंग हायस्कूल व साने गुरुजी कथामालेच्या वतीने शनिवारी सकाळी बालसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

कोथिंबीर काढणी

दानापूर : दानापूर व परिसरातील शेतकऱ्यांनी कोथिंबीर लागवड केली आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी कोथिंबीर काढणी सुरू केली असून, मजुरांच्या हाताला काम मिळत आहे.

Web Title: Traffic congestion persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.