शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयाचे गेट तोडून ट्रॅक्टर पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

भोकरदन येथील घटना; कोतवालाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : तहसील कार्यालयाचे गेट तोडून वाळू तस्करांनी ...

भोकरदन येथील घटना; कोतवालाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

भोकरदन : तहसील कार्यालयाचे गेट तोडून वाळू तस्करांनी ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यावेळी ट्रॅक्टर अडविणाऱ्या कोतवालाच्या अंगावर टॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाला.

बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास महसूलच्या पथकाने जवखेडा ठोंबरे शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात विनानंबरचा वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला. यावेळी पंचनामा करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात उभा करण्यात आला होता. बुधवारी मध्यरात्री चालक नारायण रामराव ठोंबरे, मालक भरत नाना कोंडके, नितीन सुदाम कोंडके, नारायण कोंडके यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात घुसून ट्रॅक्टर सुरू केला. यावेळी आवाज आल्याने कोतवाल प्रभू बंडू मोरे यांनी ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाळू तस्कारांनी मोरे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तहसील कार्यालयाचे गेट तोडून ट्रॅक्टर पळवला. याप्रकरणी कोतवाल प्रभू मोरे यांच्या तक्रारीवरून चौघांविरुध्द ५ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसील कार्यालयातील तिसरी घटना

भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करणारी टोळी सक्रिय आहे. ज्याची सत्ता आहे, त्याच्या मागेपुढे फिरून हे माफिया अधिकाऱ्यांवर राजकीय दडपण आणतात. त्यामुळे पोलीस व महसूल विभागाने अक्षरश: वाळू माफियांसमोर हात टेकले आहेत. तहसील कार्यालयातून वाहने पळवून नेल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी २५ फेब्रुवारी २०२० रोजी याच कार्यालयातून जेसीबी पळविण्यात आले होते. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टर पळवून नेला. त्यानंतर आता बुधवारी ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, आतापर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.