शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

गणनेच्या वेळी तीन अस्वलांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:05 IST

जालना जिल्ह्यातील जास्त जंगल असलेल्या भागात प्राणी गणना करण्यात आल्याचे ते म्हणाले. ही गणना करताना जाफराबाद तालुक्यातील खडकपूर्णा बॅक वॉटर परिसरात तीन अस्वलांचे दर्शन घडल्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दरवर्षी बुध्द पौर्णिमेच्या दिवशी प्राणीगणना करण्यात येते. यंदाही ती करण्यात आली. शनिवारी सकाळी दहा ते रविवारी सकाळी दहा असे २४ तास वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही गणना केल्याची माहिती सहायक वन सरंक्षक अधिकारी जी.एम. शिंदे यांनी दिली. जालना जिल्ह्यातील जास्त जंगल असलेल्या भागात ही प्राणी गणना करण्यात आल्याचे ते म्हणाले. ही गणना करताना जाफराबाद तालुक्यातील खडकपूर्णा बॅक वॉटर परिसरात तीन अस्वलांचे दर्शन घडल्याचे सांगितले.ही गणना करण्यासाठी वनविभागाने कृत्रिम मचाण तयार केले होते. जिल्ह्यातील वनविभागाने उभालेल्या पाणवठ्यासह नैसर्गिक पाणवठ्यावर रात्री प्राण्यांची मोठी ये- जा असते. ही बाब लक्षात घेऊन जालना येथील वनक्षेत्रपाल श्रीकांत इटलोड यांच्यासह वनपाल घुगे, बुरकूले, कचलोर, राठोड आदींसह १९ वनरक्षक तसेच १२५ वनमजुरांच्यामदतीने ही गणना करण्यात आली. ही गणना धावडा, भोकरदन, जालना, उमरी, मंठा, उस्वद, परतूर, अंबड, किनगाव, जामखेड, सिंधी काळेगाव, काजळा, बदनापूर, उज्जैनपुरी, चित्तोडा आदी गावांचा त्यात समावेश आहे.बिबट्याचा रहिवासही ऊस पट्ट्यात आहे, परंतु शनिवारी तो दिसला नसल्याचे सांगण्यातआले. या प्राणी गणनेत लांडगे १५०, तरस ८०, नीलगाय ४५०, काळवीट ४६०, ससे २००, मोर १७०, रानडुकर ६००, कोल्हे ६५ अशी संख्या आहे.या प्राण्यांचे झाले दर्शनवन्य जीव विभागाकडून करण्यात आलेल्या प्राणी गणनेच्या वेळी तीन अस्वल, नीलगाय, तरस, लांडगे, ससे, काळवीट इ.चा समावेश आहे. धावड्याच्या जंगलात बिबट्याही असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. मात्र, ते नजरेस पडले नाहीत. तीन बिबटे असल्याची माहिती आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग