शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या शोधार्थ तीन पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:41 IST

शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात बुधवारी दुपारी एकास मारहाण करून ५ लाख ८० हजार रूपयांची रोकड चौघांनी लंपास केली होती. आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकासह चंदनझिरा पोलिसांचे पथक कार्यरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात बुधवारी दुपारी एकास मारहाण करून ५ लाख ८० हजार रूपयांची रोकड चौघांनी लंपास केली होती. या प्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकासह चंदनझिरा पोलिसांचे पथक कार्यरत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयितांचा शोध सुरू केला आहे.शहरातील उद्योजक विशाल दाड हे बुधवारी दुपारी त्यांच्या कारमधून औद्योगिक वसाहतीतील कंपनीत आले होते. कंपनीच्या प्रवेशद्वारावर कार उभा करून त्यांचे सहकारी कर्मचारी अल्लमखाँ पठाण यांना कारमधील डबा व बॅग आणण्यास सांगितले. दाड आतमध्ये गेल्यानंतर पठाण हे कारमधील बॅग घेऊन कंपनीत जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांपैकी एकाने पठाण यांच्यावर लोखंडी रॉडने वार करून ५ लाख ८० हजार रूपयांची पैशांची बॅग घेत पोबारा केला. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पळून गेले. या प्रकरणात दाड यांच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यानुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकासह चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पथक कार्यरत आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत आरोपींचा शोध लागला नव्हता.

टॅग्स :RobberyचोरीJalna Policeजालना पोलीसCrime Newsगुन्हेगारी