जिल्ह्यामध्ये तीन लाख ९७ हजार वाहने; प्रदूषण चाचणी केवळ २५ हजार वाहनांचीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:46+5:302021-01-08T05:41:46+5:30
प्रदूषण नियंत्रणासाठी शासनाने प्रत्येक वाहनचालकाला प्रदूषण नियंत्रण चाचणी करण्याची सक्ती केली आहे. याासाठी शहरात ठिकठिकाणी पीयूसी केंद्र आहेत. या ...

जिल्ह्यामध्ये तीन लाख ९७ हजार वाहने; प्रदूषण चाचणी केवळ २५ हजार वाहनांचीच !
प्रदूषण नियंत्रणासाठी शासनाने प्रत्येक वाहनचालकाला प्रदूषण नियंत्रण चाचणी करण्याची सक्ती केली आहे. याासाठी शहरात ठिकठिकाणी पीयूसी केंद्र आहेत. या केंद्रांवर अगदी कमी पैशांमध्ये प्रदूषण चाचणी केली जाते. कार, जीप, ट्रक, ॲपेच्या तपासणी केवळ ११० रूपये घेतले जातात. दुचाकीसाठी ५० रूपये घेतले जातात. असे असतानाही वाहनचालक प्रदूषण चाचणी करण्याकडे कानाडोळा करीत आहे. वर्षभरात प्रदूषण चाचणी न करणाऱ्या २६१ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ लाख ६१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली.
पीयूसी केली नाही म्हणून
केवळ २६१ वाहनांना दंड
पीयूसी न केलेल्या वाहनधारकास १ हजार रूपयांचा दंड करण्याची तरतूद आहे. त्यानुसार मागील वर्षभरात आरटीओ विभागाने २६१ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ६१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पीयूसी न करणाऱ्या वाहनांवर येणाऱ्या काळात कडक कारवाईसाठी विशेष मोहीम राबविली जाईल. वाहनधारकांनी पीयूसी करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कडक कारवाई केली जाईल
पीयूसी न करणाऱ्या २६१ वाहनधारकांना आम्ही दंड केला आहे. २५ हजार वाहनांनी पीयूसी केली आहे. पीयूसी न करणाऱ्या वाहनधारकांविरुध्द कडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. वाहनधारकांनी पीयूसी करावी.
-जगनाथ काळे
आरटीओ अधिकारी