शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

वेगवेगळ्या अपघातांत तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:34 IST

भरधाव वेगातील इंडीका कार दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या बाजूला पलटी होवून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील बाणेगाव पाटीजवळील दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : भरधाव वेगातील इंडीका कार दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या बाजूला पलटी होवून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील बाणेगाव पाटीजवळील दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमींना उपचारासाठी जालन्याला हलवण्यात आले आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, जीप कार (क्रमांक जी.जे.0५ई क्यू ८८७२) ही भोकरदनहून भरधाव वेगाने राजूरकडे येत असताना एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे इंडिका कार बाणेगाव पाटी जवळील पडोळवस्ती जवळ रस्त्याच्या बाजूला उलटली. यामधे धर्मेश कोटरिया (रा.सूरत) हा जागीच ठार झाला तर गाडीतील सतिश जैस्वाल, गोपाल जैस्वाल (दोघे रा.पारेगाव, मध्यप्रदेश) हे जखमी झाले. अपघात घडताच आसपासच्या नागरिकांनी मदत करून जखमींना तातडीने रूग्णवाहीकेतून जालन्याला हलवले. अपघाताची माहिती मिळताच राजूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हयाची नोंद झाली नव्हती.गेल्या काही महिन्यांपासून जालना ते भोकरदन या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी हा रस्ता चांगला असल्याने अपघात कमी होत, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.जीपच्या धडकेत युवक ठारमानदेऊळगाव : जालना राजूर रस्त्यावरील तांदूळवाडी फाट्याजवळ एका बोलेरो गाडीने दुचाकीला जोराची धडक दिली. यात एका युवकाचा मुत्यू झाला. तर दोन वर्षांचा मुलगा जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास झाला.सतीश शेषराव दाभाडे (२६, रा. चिंचोली ता. भोकरदन ) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रेम दीपक दाभाडे हा दोन वर्षांचा चिमुकला यात जखमी झाला आहे. सतीश दाभाडे हे आपल्या चुलत भावाच्या दोन वर्षांच्या मुलासोबत दुचाकीने (एम.एच. २१. बी. जी. ७६३७) आपल्या चुलत भावाला भेटण्यासाठी जात असतांना बोलोरो (एम. एच. २१. एल. ४२७) या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली. यात सतीश दाभाडे हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या सोबत असलेला दोन वर्षांचा चिमुकला जखमी झाला. त्या चिमुकल्यावर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, बोलेरो ही गाडी भोकरदन गटविकास अधिकाऱ्यांची असून, या गाडीतून चालक अणि लिपिक महत्वाचे कागदपत्रे घेऊन जालन्याकडे येत होते. अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोउपनि. गिरासे, पो. कॉ. वाघ, मतकर, जोशी, लहाने आदी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू