कोरोनामुळे तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:42+5:302021-01-01T04:21:42+5:30
जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या तिघांचा गुरूवारी मृत्यू झाला. गुरूवारीच २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ४१ ...

कोरोनामुळे तिघांचा मृत्यू
जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या तिघांचा गुरूवारी मृत्यू झाला. गुरूवारीच २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ४१ जणांना यशस्वी उपचारानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार १६७ वर गेली असून, आजवर ३४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२ हजार ५३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अंबड शहरातील एकास कोरोनाची लागण झाली. बदनापूर शहरातील १ तर तालुक्यातील धामणगाव १, मालेगाव येथील एकास कोरोनाची बाधा झाली. जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परभणी जिल्ह्यातील २ तर बुलडाणा जिल्ह्यातील तिघांना कोरोनाची लागण झाली. संस्थात्मक अलगीकरणात भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात दोघांना ठेवण्यात आले आहे.