शेतकरी व कामगार विरोधी तीन काळे कायदे मागे घेण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:17+5:302021-03-31T04:30:17+5:30
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी राज्यभर उपोषण करण्यात आले. या अनुषंगाने जालना जिल्हा ...

शेतकरी व कामगार विरोधी तीन काळे कायदे मागे घेण्यात यावे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी राज्यभर उपोषण करण्यात आले. या अनुषंगाने जालना जिल्हा काँग्रेस कमिटीने निवेदन दिले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कृषी विरोधी तीन काळे कायदे हे शेतकरी आणि कामगारविरोधी आहेत. हे काळे कायदे मागे घेण्यात यावेत. यासाठी सोनिया गांधी यांनी देशभर आवाज उठवून वेळोवेळी आंदोलन उभारले आहे. परंतु, केंद्र सरकार हे हिटलरशाही पद्धतीने वागत असल्यामुळे शेतकऱ्यांवर आणि कामगारांवर मोठा अन्याय होत आहे. गेल्या शंभर दिवसांपासून दिल्ली येथे किसान युनियनच्या वतीने आंदोलन सुरू आहे. परंतु, केंद्र सरकार याकडे जाणूनबुजून कानाडोळा करीत आहे. याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर आ. कैलास गोरंट्याल, भीमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंढे, विजय कामड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, विमल आगलावे, आनंद लोखंडे, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, विष्णुपंथ कंटोले, चंद्रकांत रत्नपारखे, सोपान सपकाळ, रघुनाथ ताठे, डॉ. विशाल धानुरे, राहुल देशमुख, बदर चाऊस, गुरूमितसिंग सेना, अशोक उबाळे, रामजी शेजुळ, नंदा पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
===Photopath===
300321\30jan_2_30032021_15.jpg
===Caption===
जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणि वाढत्या महागाईला लगाम घालण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना निवेदन देतांना राजाभाऊ देशमुख, भीमराव डोंगरे, कल्याणराव दळे, शेख महेमूद, सत्संग मुंढे आदी.