अवैध दारूची विक्री करणारे तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:57+5:302021-09-09T04:36:57+5:30
मंठा : पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे मंठा पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून अवैध धंद्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. मंठा ...

अवैध दारूची विक्री करणारे तिघे अटकेत
मंठा : पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे मंठा पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून अवैध धंद्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. मंठा शहरात विविध ठिकाणी अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.
मंठा शहरातील टी-पाॅईंट येथे अवैधरीत्या दारूची विक्री करणारा संशयित नवनाथ दशरथ भवाळे (२४ रा. केडारवाकडी) याला अटक करून त्याच्याकडून ६८०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व एक लाख रुपये किमतीची जीप जप्त करण्यात आली. त्यानंतर रवि आत्माराम जाधव (३०) व बळीराम काचरू राठोड (७४ दोन्ही रा. उमरखेडा ता. मंठा) याच्याकडून २८२० रुपये किमतीच्या देशी दारुच्या बाटल्या व ५० हजार रुपये किमतीचा तीन चाकी रिक्षा जप्त करण्यात आली. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुध्द मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उप निरीक्षक राऊत, पोका. दीपक आढे, विलास कातकडे, संदीप राठोड यांनी केली आहे.