शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

जालना जिल्ह्यातील साडेतीन हजार शिक्षकांची होणार कोरोनाची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 7:25 PM

जिल्ह्यातील ५२३ शाळांत ९ ते १२ वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत आहेत.  

ठळक मुद्देशिक्षकांना शाळेत जाण्यापूर्वी चाचणी करणे बंधनकारक

जालना : शाळा सुरू होण्यापूर्वी सर्वच शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील ३ हजार ७७९ शिक्षकांची चाचणी केली जाणार असून,  शिक्षण विभागाकडून तसे नियोजन करण्यात आले आहे. ही चाचणी सर्वांनी करणे बंधनकारक असून, त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. 

जिल्ह्यातील ५२३ शाळांत ९ ते १२ वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत आहेत.  या वर्गांना शिकविणाऱ्या १० हजार शिक्षकांची १७ ते २१ नोव्हेंबरपर्यंत आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. पुढील १७ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दर दिवसाला २०० ते ३०० शिक्षकांच्या तपासण्या करून त्यांचे अहवाल देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे. शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी बैठकांवर बैठका पार पडत आहेत. शिक्षण आयुक्त विशाल सोळुंके यांनी नुकतीच तयारीची आढावा बैठक घेतली.  शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, मास्क, सॅनिटायझरची उपलब्धता शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ग्रामंपचायतींना पंचायत विभागाकडून साहित्य उपलब्धतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.  

पालकाच्या संमतीपत्रानंतरच विद्यार्थ्याला प्रवेशकोरोनामुळे अनेक पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास नकार देत होते. सध्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे आता बहुतांश पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार आहेत; परंतु खबरदारी म्हणून शासन पालकांकडून संमतीपत्र भरून घेत आहेत. संमतीपत्राशिवाय विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही.  

शिक्षकांच्या कोरोना चाचणीला सुरुवात झाली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे अँटिजन न करता आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. दररोज २०० चाचण्या करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला आहेत.- नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी

तालुकानिहाय शिक्षकांची संख्यातालुका      शिक्षक संख्याजालना    १,०७६बदनापूर    २८१अंबड    ३७९घनसावंगी    २८२परतूर    ३४८मंठा    २५९भोकरदन    ७९६जाफराबाद   ३५८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalanaजालना