शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साडेतीन कोटींचा टंचाई कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 21:00 IST

जालना तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई पाहता पंचायत समिती प्रशासनाने ३ कोटी ४४ लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा सादर केला

जालना : जानेवारी ते जून या कालावधीतील जालना तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई पाहता पंचायत समिती प्रशासनाने ३ कोटी ४४ लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. यात नळ योजना विशेष दुरूस्तीचे ४४ प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आले आहेत.गतवर्षी परतीचा पाऊस दमदार झाल्याने जालना तालुक्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये सध्या पाणीसाठे उपलब्ध आहेत. मात्र, मार्च-एप्रिल नंतर काही प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पंचायत समिती प्रशासनाने गावनिहाय पाहणी करून आढावा घेतला होता. या आढाव्यानंतर जानेवारी ते जून २०२० या कालावधीतील संभाव्य टंचाई पाहता ३ कोटी ४४ लाख २२ हजार रूपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.यात १३८ गावे, १२ वाड्यांवर १५० नवीन विंधन विहिरी घेणे, ३७ गावे आणि ७ वाड्यांमधील ४४ नळ योजना विशेष दुरूस्ती करणे, ६ गावे आणि ४ वाड्यांमध्ये १० तात्पुरत्या पूरक योजना घेणे, १०० गावे व ४३ वाड्यांसाठी १४३ खासगी विहीर अधिग्रहण करणे, १६ गावे एका वाडीसाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाय प्रस्तावित करण्यात आले आहेत. या उपायांसाठी अंदाजित खर्च ३ कोटी ४४ लाख २२ हजार रूपये येणार आहे. शहरी भाग वगळता तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश जलस्त्रोतात पाणीसाठा आहे. शिवाय हातपंप, गावातील कूपनलिकांनाही सध्या मुबलक पाणी आहे. पुढील मार्च-एप्रिलमध्ये निर्माण होणा-या संभाव्य पाणीटंचाईच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पंचायत समिती प्रशासनाने हा टंचाई आराखडा वरिष्ठ पातळीवर दाखल केला आहे.टँकरसाठी लागणार १ कोटीप्रस्तावित योजनांमध्ये नवीन विंधन विहिरींसाठी ७५ लाख रूपये, नळ योजना विशेष दुरूस्तीसाठी ८४.५० लाख रूपये, तात्पुरती पूरक योजना घेण्यासाठी २५.५० लाख रूपये, खाजगी विहीर अधिग्रहणासाठी ७७.३२ लाख रूपये, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी २ लाख रूपये असा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.टंचाई होऊ नये म्हणून दक्षतासंभाव्य पाणीटंचाई आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक दक्षता घेतली जाते. याचाच एक भाग म्हणून विविध प्रस्तावित योजनांचा साधारणत: सव्वा तीन कोटींचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.संजय कुलकर्णीगटविकास अधिकारी, जालना

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक