पैशासाठी धमकी; दोघाविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST2021-02-18T04:56:12+5:302021-02-18T04:56:12+5:30
चोरट्यांनी लॉक तोडून केली दुचाकीची चोरी अंबड : पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील तुकाराम सातपुते यांनी त्यांची दुचाकी (क्र. एम.एच. ...

पैशासाठी धमकी; दोघाविरूध्द गुन्हा
चोरट्यांनी लॉक तोडून केली दुचाकीची चोरी
अंबड : पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील तुकाराम सातपुते यांनी त्यांची दुचाकी (क्र. एम.एच. १४- एफवाय. ५५२२) ११ फेब्रुवारी रोजी दर्गा परांडा मंदिर परिसरात लावली होती. चोरट्यांनी लॉक तोडून ती दुचाकी लंपास केली. या प्रकरणी सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार शेळके हे करीत आहेत.
अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्रीसह परिसरात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. दारूमुळे भांडण तंट्यात वाढ होत असून, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिलांनाही नाहक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.