तिसरी लाट; प्रशासन तत्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:14+5:302021-07-09T04:20:14+5:30
जालना : संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य आणि जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. महिला व बालकल्याण रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात ...

तिसरी लाट; प्रशासन तत्पर
जालना : संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य आणि जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. महिला व बालकल्याण रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात मिळून १२० खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. असे असले तरी तज्ज्ञांकडून डेल्टा या कोरोनाच्याच नवीन विषाणूने भीती निर्माण केली आहे. या डेल्टा विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत असून, या डेल्टाला रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. विशेष करून लहान मुलांसाठी ११ बालरोग तज्ज्ञांचा समावेश या टास्कफोर्समध्ये करण्यात आला आहे. या डॉक्टरांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जात असून, डेल्टा विषाणू अद्याप जालना जिल्ह्यात आढळलेला नाही. या विषाणूची चाचणी करण्यासाठी जालना येथील कोविड प्रयोगशाळेतील वेगवेगळ्या वयोगटाचे शंभर सॅम्पल केंद्रीय विषाणू तपासणी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अद्याप या सॅम्पलचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सध्यातरी डेल्टा विषाणू सापडलेला नाही.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना हा विषाणू कवेत घेण्याची अधिकची भीती तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध असलेले आयसीयू उभारणीचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी अचानक पुन्हा फैलाव झाल्यास कोविड केअर सेंटरसह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतंत्र ६० खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारले जात आहे.
याचे काम प्रगतिपथावर असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना येथे हलविण्यात येणार आहे.
डाॅक्टरांना प्रशिक्षण
n कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी आतापासूनच केली जात आहे. यामध्ये ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता वाढविणे
n ऑक्सिजन निर्मिती करणे, आदींना प्राधान्य दिले जात आहे. या प्रशासनाच्या तयारीला आरोग्य विभागाची साथ मिळत आहे.
n टास्कफोर्समधील ११ बालरोग तज्ज्ञांना तिसरी लाट उद्भवल्यास तिला कसे सामोरे जायचे, याबद्दलचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.