वरूड बुद्रुक येथे चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST2021-01-15T04:25:33+5:302021-01-15T04:25:33+5:30
आत्मनिर्भर योजनेंतर्गत रविवारी कार्यशाळा जालना : भारतीय जैन संघटनेच्यावतीने विविध व्यवसायात कार्यरत युवकांसाठी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रविवार १७ जानेवारी ...

वरूड बुद्रुक येथे चोरट्यांचा धुमाकूळ
आत्मनिर्भर योजनेंतर्गत रविवारी कार्यशाळा
जालना : भारतीय जैन संघटनेच्यावतीने विविध व्यवसायात कार्यरत युवकांसाठी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रविवार १७ जानेवारी रोजी सकाळी ऑनाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्याध्यक्ष हस्तीमल बंब यांनी दिली. यावेळी युवकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार असून, उद्योग, व्यवसायाच्या संधीची माहिती दिली जाणार आहे. तरी युवकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन बंब यांनी केले आहे.
पिठोरी सिरसगाव येथे किशोर स्वास्थ्य शिबिर
अंबड : तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील उपकेंद्रात राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन आरोग्य दिवस व किशोरवयीन आरोग्य संघाची बैठक घेण्यात आली. यावेळी गोंदी आरोग्य केंद्रातील डॉ. मुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीस सरपंच भीमराव तुपे, यू. एल. कुटे, ए. एस. नाझरकर, डॉ. अविनाश खेडकर, संध्या वैद्य, सुरेखा तुपे, रोहिणी बिडे, मुक्ता गावडे, लंका उन्हाळे आदींची उपस्थिती होती.