शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य बाजारपेठेतील तीन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:14 IST

सिंधी बाजार भागातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी १० हजार २०० रूपयांची रोकड लंपास केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सिंधी बाजार भागातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी १० हजार २०० रूपयांची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास समोर आली असून, चोरटा ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.जालना शहरात वाहन चोऱ्यांचे सत्र सुरू असून, चोरट्यांनी चक्क एका राष्ट्रीयकृत बँकेच्या स्ट्राँग रूमपर्यंत प्रवेश केला होता. तासभर प्रयत्न करूनही तिजोरी न फुटल्याने चोरट्याने तेथून काढता पाय घेतला. चोरट्यांनी शनिवारी पहाटे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सिंधी बाजार भागातील एका हॉटेलसह दोन दुकाने फोडली. विनोद अग्रवाल हे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास किराणा दुकान बंद करून घरी गेले होते. शनिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर शटरचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये पाहणी केली असता गल्ल्यातील १२०० रूपये चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. तसेच या दुकानाशेजारील संजय पैठणकर यांच्या हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. या हॉटेलमधील रोख ३५०० रूपये लंपास केले. तर महेंद्र राजपूत यांचे दुकान फोडून आतील ५५०० रूपयांची रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, बाजारपेठेतील तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याने व्यापा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.रेस्टॉरन्ट फोडण्याचा प्रयत्नशहरातील वीर सावरकर चौक येथे विपीन अग्रवाल यांचे बार व रेस्टॉरन्ट आहे. या रेस्टॉरन्टच्या शटरचे कुलूप तोडून, शटरच्या पट्ट्या तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस