मोंढ्यात चालत्या गाडीवरून चोरट्यांनी तीन लाखांची बॅग लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST2021-03-23T04:31:57+5:302021-03-23T04:31:57+5:30
या आधीदेखील या मोंढा भागाता चोरट्यांनी बँकेसह अन्य एका व्यापाऱ्याला लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर या भागात पोलीस चौकी ...

मोंढ्यात चालत्या गाडीवरून चोरट्यांनी तीन लाखांची बॅग लांबविली
या आधीदेखील या मोंढा भागाता चोरट्यांनी बँकेसह अन्य एका व्यापाऱ्याला लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर या भागात पोलीस चौकी उभारावी म्हणून व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तसेच बाजार समितीचे सभापती आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार खोतकर यांनीदेखील ही बाब गंभीरतेने घेऊन या भागात कायमस्वरूपी चौकी उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु नवीन पोलीस चौकी तसेच ठाण्यांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. किमान या ताज्या घटनेने तरी पोलीस प्रशासनाकडून येथे कायमस्वरूपी पोलीस चौकीसाठी प्रयत्न राहतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
चौकट
या लूटची माहिती पोलिसांना कळाल्यावर लगेचच सदर बाजार ठाण्याचे निरीक्षक संजय देशमुख, चंदनझिरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगताप यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित व्यापाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच सीसीटीव्हीचे फुटेजही तपासले. त्यात तीन चोरटे कैद झाले आहेत. ते फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तपासाठी पथके
मोंढ्यात झालेल्या या चोरीचा तपास लावण्यासाठी आम्ही दोन पथके केले असल्याची माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत जाधव यांनी सांगितले. यासाठी सदरबाजार ठाण्याची मदत घेण्यात येऊन आपण आणि सदर बाजार ठाण्याचे निरीक्षक देशमुख याचा छडालवकरच लावू असे जाधव यांनी सांगितले.