सेलगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST2021-07-29T04:30:15+5:302021-07-29T04:30:15+5:30

मोबाइल हिसकावला : गुन्हा दाखल जालना : पायी चालणाऱ्या एका व्यक्तीचा दोन इसमांनी मोबाइल हिसकावून नेल्याची घटना जालना शहरातील ...

Thieves in Selgaon | सेलगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ

सेलगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ

मोबाइल हिसकावला : गुन्हा दाखल

जालना : पायी चालणाऱ्या एका व्यक्तीचा दोन इसमांनी मोबाइल हिसकावून नेल्याची घटना जालना शहरातील गुरुबच्चन चौक येथे २७ जुलै रोजी घडली. या प्रकरणी विनोद शिंगणे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हे करीत आहेत.

मेडिकलसमोरून दुचाकी चोरी

जालना : बस स्थानकासमोरील साई मेडिकलसमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २७ जुलै रोजी घडली. या प्रकरणी विनायक भंडारी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अवैध दारूची विक्री करणारा अटकेत

जालना : अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून ४८० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी विकास जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित गणेश किसन निकाळजे (४५ रा.वाढोणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जालना : लोकांना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना एकास अटक करण्यात आली. या प्रकरणी जीवन भालके यांच्या फिर्यादीवरून संशयित शेख यकीम शेख मुकीम (सर्व रा.पारध, ता.भोकरदन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Thieves in Selgaon