शिक्षकांत वैचारिक क्रांती करण्याची मोठी ताकद - येवते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:21+5:302021-09-07T04:36:21+5:30
भोकरदन तालुक्यातील उमरखेडा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित ‘वंदन गुरुजनांना’ तसेच ‘थँक्स टीचर’ या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. ...

शिक्षकांत वैचारिक क्रांती करण्याची मोठी ताकद - येवते
भोकरदन तालुक्यातील उमरखेडा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित ‘वंदन गुरुजनांना’ तसेच ‘थँक्स टीचर’ या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरोनासारख्या बिकट काळामध्ये विविध माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवण्याची तळमळ करणाऱ्या शाळेतील सर्वच शिक्षकांचा अभिमान वाटतो, असे सांगून विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न बघायला शिकावे, विद्यार्थ्यांनो, तुम्ही उद्याचे फार मोठे शिक्षक बनाल, असे आवाहनही केले. या वेळी मोहिनी फुके, सौरभ कांबळे, आदित्य दळवी, तन्मय घायाळ, मयूर फुके, शिवकन्या फुके, तन्वी फुके, ऋतुजा फुके, शिवानी फुके, भक्ती फुके या विद्यार्थ्यांनी या वेळी मी शिक्षक झालो तर, माझे आवडते गुरुजी या विषयांवर भाषणे केली.
कार्यक्रमासाठी डॉ. संजय येवते, रमेश पुंगळे, डॉ. सारंगधर फुके, सरपंच राजू होलगे, साधनव्यक्ती नारायण पिंपळे, चंद्रशेखर देशमुख, संदीप देशमुख, ग्रामसेविका खांडेभराड, काळे, पऱ्हाड, घायाळ, झगरे यांच्यासह विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांनी केले. प्रास्ताविक दत्तात्रय घायाळ तर आभार दिलीप पऱ्हाड यांनी मानले.