बदनापुरात पाच ठिकाणी चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST2020-12-23T04:27:25+5:302020-12-23T04:27:25+5:30
फोटो बदनापूर : शहरातील विविध भागांतील पाच घरे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडली. या चोरीत जवळपास १० लाख ४१ हजार ...

बदनापुरात पाच ठिकाणी चोऱ्या
फोटो
बदनापूर : शहरातील विविध भागांतील पाच घरे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडली. या चोरीत जवळपास १० लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
बदनापूर व्यापारी नदीम बेग इद्रीस बेग (रा. भारतनगर, रेल्वे स्टेशन रोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बेग हे दुकानावर काम करून सोमवारी रात्री घरी गेले होते. पहाटेच्या सुमारास त्यांच्या भावजयीने घरी चोरी झाल्याचे त्यांना सांगितले. घरातील साहित्य सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीची पाच तोळ्यांची पोत, ४५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे नेकलेस, ३० हजार रुपयांच्या अंगठ्या, ४५ हजारांचे दीड तोळ्याचे झुंबर, ९० हजारांचे तीन तोळ्याचे नेकलेस, ६० हजारांची दोन तोळ्याची बोरमाळ, ३० हजारांची गळ्यातील लांब पोत, ४५ हजारांचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र असा एकूण ४ लाख ९५ हजारांचे साडेसोळा तोळे सोने व रोख पाच लाख रुपये असा १० लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच शेजारील गल्लीमध्ये राहणारे हनिद शहा मोहम्मद कुरेशी, नारायण शेषराव रेगुडे, राधाबाई अण्णा सवडे, शेख सलमान शेख मन्नान यांच्या घरी झाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक भिमाळे करीत आहेत.
श्वान घुटमळले
घटनास्थळाची बदनापूर पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी दाखल श्वानाने घरापासून एका शाळेपर्यंत चोरट्यांचा माग काढला; परंतु त्यानंतर श्वान तेथेच घुटमळले.