बकऱ्यासह सौरऊर्जेच्या बॅटऱ्या चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:23+5:302021-08-20T04:34:23+5:30

मेडिकलसमोर उभी केलेली दुचाकी लंपास जालना : मेडिकलसमोर उभी केलेली दुचाकी लंपास केल्याची घटना जालना शहरातील मंठा चौफुली येथील ...

Theft of solar batteries including goats | बकऱ्यासह सौरऊर्जेच्या बॅटऱ्या चोरीस

बकऱ्यासह सौरऊर्जेच्या बॅटऱ्या चोरीस

मेडिकलसमोर उभी

केलेली दुचाकी लंपास

जालना : मेडिकलसमोर उभी केलेली दुचाकी लंपास केल्याची घटना जालना शहरातील मंठा चौफुली येथील अनन्या मेडिकलसमोर घडली. याप्रकरणी शिवदीप शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जालना शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दुचाकी चोऱ्यांमधील आरोपींना विविध ठाण्यांतील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुचाकी दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू

जालना : दुचाकी दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू झाल्याची घटना देऊळगावराजा रोडवरील जामवाडीजवळ घडली. डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. आदित्य दत्तात्रय भोपळे (दत्तनगर, देऊळगावराजा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास डोईफोडे करीत आहेत.

Web Title: Theft of solar batteries including goats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.