सोन्याच्या दुकानात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST2021-02-18T04:56:17+5:302021-02-18T04:56:17+5:30
रजिस्ट्री ऑफिस समोरील घरात चोरी परतूर : शहरातील रजिस्ट्री कार्यालयासमोर बळीराम अर्जुनराव खवळ यांचे घर आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ...

सोन्याच्या दुकानात चोरी
रजिस्ट्री ऑफिस समोरील घरात चोरी
परतूर : शहरातील रजिस्ट्री कार्यालयासमोर बळीराम अर्जुनराव खवळ यांचे घर आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून दागिने, रोख रक्कम असा एकूण ६० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी खवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फुपाटे हे करीत आहेत.
ज्ञानेश्वरी ग्रंथाची टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक
चंदनझिरा : येथील सिध्दीविनायक गणपती मंदिर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची हभप दत्तात्रय महाराज हळदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. त्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथांचे टाळ-मृदुंगाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भागवताचार्य ह.भ.प. शत्रुघ्न महाराज डायगव्हानकर, शारदा मापारी, जनार्दन बोचरे, संतोष गोरे, रुक्मिणी हावरे, दत्तात्रय माळवंडीकर, दत्तात्रय महाराज हळदे यांच्यासह चंदनझिरा व परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.
लक्कडकोट भागातील दुकानामध्ये चोरी
जालना : शहरातील लक्कडकोट भागातील रविलाल कांजीभाऊ पटेल यांचे हार्डवेअरचे दुकान मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी दुकानातील दहा हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच सदरबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. या प्रकरणी पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीप- दुचाकी अपघात; चालकाविरूध्द गुन्हा
परतूर : तालुक्यातील सातोना येथे सेामवारी दुपारी भरधाव जीपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एकजण जखमी झाला. नागरिकांनी जखमीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. जखमीचा भाचा अविनाश चंदर (रा. ढाकेफळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीप चालकाविरूध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शिंदे हे करीत आहेत.